PostImage

सुपर फास्ट बातमी

March 28, 2024   

PostImage

वॉशिंग मशीनमध्ये लपविल्या नोटा


 

१८०० कोटींचा घोटाळा: शिपिंग कंपनी संचालकाच्या घरी ईडीचा छापा

 

 मुंबई: काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल १८०० कोटी रुपये मूल्याचे परकीय चलन परदेशात पाठविल्याचा आरोप असलेल्या मुंबईस्थित एका शिपिंग उद्योगातील कंपनीवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. मुंबईसह दिल्ली, हैदराबाद, कुरुक्षेत्र आणि कोलकाता येथे ही छापेमारी झाली आहे. मात्र, दक्षिण मुंबईत झालेल्या छापेमारीदरम्यान लाखो रुपयांची रोख रक्कम वॉशिंग मशीनमध्ये आढळली.

 

 या प्रकरणी संबंधित कंपनीची एकूण ४७ बैंक खाती गोठवण्यात आली आहेत.

 

मुंबईस्थित कॅप्रिकॉर्नियन शिपिंग अँड लॉजिस्टिक या कंपनीचे संचालक विजय कुमार शुक्ला आणि संजय गोस्वामी यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १८०० कोटी रुपये मूल्याचे परकीय चलन परदेशात पाठवल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.

 

या प्रकरणी ईडीने परदेशी चलन विनिमय कायद्यांतर्गत (फेमा) तपास सुरू केला आहे. या छापेमारीदरम्यान कॅप्रिकॉर्नियन कंपनीशी संबंधित अन्य पाच कंपन्यांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. हे पैसे या लोकांनी सिंगापूरस्थित कंपनीला पाठविल्याचे ईडीचे म्हणणे आहे.